मराठी समीक्षा अजूनही ‘बालभारती’, ‘कुमारभारती’, ‘युवक भारती’ अशा वर्गीकरणात कोंडून पडलेली आहे!
मराठीतील समीक्षा व्यवहाराला बोथट करण्याचं काम ‘प्रस्तावनावीर’ आणि ‘पाठराखण करणारे महामहोपाध्याय’ यांनी जोमात सुरू ठेवलेले आहे. सांस्कृतिक लढाईचा विचार पाठराखण करताना किंवा प्रदीर्घ प्रस्तावना लिहिताना होताना दिसत नाही. उलट ज्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, पाठराखण केली, तो या लढाईपासून बाजूला होताना दिसतो. यामुळे मराठी समीक्षेतील टीकात्मकता जवळपास नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.......